फलटण प्रतिनिधी
दुकानातून मोबाईल चोरून नेले प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास गजानन चौक तेली गल्ली फलटण येथील AK नावाचे टॅटो स्टुडिओ दुकानातून येथून फिर्यादी अभिजीत बापूराव कारंडे (राहणार दातेवस्ती सस्तेवाडी तालुका फलटण) यांचा मोबाईल हँडसेट हा अथर्व रमेश शिंदे (राहणार सांगवी तालुका फलटण) याने अभिजीत बापूराव कारंडे यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेहला अशी फिर्याद अभिजीत बापूराव कारंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असून अथर्व रमेश शिंदे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. ना. घाडगे करत आहेत.