धैर्य टाईम्स :
माजी खासदार लोकनेते कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक फलटण नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा गटनेते अशोकराव जाधव यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस च्या माध्यमातून असे म्हटले आहे की, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून मी लवकरच भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असून यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही.
अशोकराव जाधव यांच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे फलटण शहरासह तालुक्यांमध्ये खासदार गटात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांना श्रद्धास्थान म्हणून जाधव एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून तालुक्यात सुप्रसिद्ध होते. मात्र खासदार गट सोडणार या त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसमुळे तालुक्यात उलट सुलट चर्चां सुरु झाल्या आहेत.
या विषयाची अधिक अपडेट्स लवकरच...