फलटण │ महाराजा प्रतिष्ठान आयोजित पवार गल्ली नवरात्र उत्सव 2025 मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे. मंडळाच्या विविध उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जय तुळजाभवानी दांडिया ग्रुप च्या दांडिया नृत्यामुळे कार्यक्रमांना रंगत आली आहे. तसेच माहेरवाशीन महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. लहान वयोगटातील मुलांसाठी गायन-नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. विजेत्या मुलांना शालेय उपयोगी वस्तूंची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जात आहेत.
शेखर ओहाळ प्रस्तुत होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) हा लोकप्रिय कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलांसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत
या भव्य “होम मिनिस्टर” कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक सचिनशेठ गानबोटे यांनी केले असून, अधिकाधिक महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.