फलटण शहरातील नावाजलेले युवा व्यक्तिमत्व शक्ती उर्फ अशोक भोसले यांचा आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी वाढदिवस मोठया उत्साहात साजरा होत आहे. क्रिकेट मैदानावर चमकणारा खेळाडू, सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारा तरुण आणि राजकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारा हा युवक सध्या फलटण नगरपालिकेचा भावी नगरसेवक म्हणून चर्चेत आहे.
शक्ती भोसले हे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विचारांच्या वर विश्वास ठेवून शक्ती भोसले यांनी राजकारणाचे नवी दिशा निश्चित केली आहे. त्यांनी नेहमी विकासाच्या राजकारणावर भर दिला असून, युवकांना सकारात्मक वाट दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कामांमुळे त्यांना फलटणमधील युवक वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
खेळाच्या क्षेत्रातसुद्धा त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. मुधोजी महाविद्यालयाचे ते उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. कोल्हापूर विद्यापीठाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.
उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व करत फलटणचे नाव उज्ज्वल केले. “खेळातून संघभावना आणि सामाजिक जबाबदारी शिकता येते,” असे ते नेहमी सांगतात.
त्यांचे वडील मुन्ना शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते असून, त्यांनी नेहमी सामाजिक ऐक्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर्श ठेवला आहे. हाच वारसा शक्ती भोसले यांनी पुढे चालवला आहे.
शक्ती भोसले हे युवकांच्या समस्यांवर थेट संवाद साधतात, मदतीसाठी तत्पर असतात, आणि फलटणच्या विकासासाठी नवीन कल्पना मांडतात. फलटणच्या नव्या पिढीचा आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम यांचे जिवंत प्रतीक म्हणजे शक्ती उर्फ अशोक भोसले. एक हातात क्रिकेटची बॅट, दुसऱ्या हातात समाजासाठी समर्पणाची ज्योत. अशी या तरुणाची ओळख आज फलटणमध्ये सर्वत्र आहे. क्रिकेट मैदानावरील विजेता
बालपणापासूनच क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवलेला शक्ती भोसले हा केवळ खेळाडू नाही, तर संघभावनेचा आदर्श आहे.
मैदानावर जिद्दीने खेळणारा हा तरुण जीवनातही तेवढ्याच जिद्दीने प्रत्येक आव्हानाला सामोरा जातो. त्याच्या खेळातील संयम, नेतृत्व आणि चिकाटी हीच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
भावी नगरसेवक — लोकसेवेची नवी दिशा
फलटण शहरातील तरुणांनी ज्या नावावर विश्वास ठेवला आहे, ते नाव म्हणजे शक्ती भोसले. त्यांची कार्यशैली स्पष्ट आहे — “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी!”
सामाजिक कामात नेहमी पुढे असणारा हा युवक गरजूंसाठी रात्री-दिवस धावत असतो. त्यांच्या विचारांत परिवर्तन, कामात प्रामाणिकपणा आणि बोलण्यात विनम्रता आहे.
माता भीमाईनगर येथे शुभेच्छा स्वीकारणार
शक्ती उर्फ अशोक भोसले हे माता भीमाईनगर, मंगळवार पेठ, फलटण येथे सकाळी 11 पासून शुभेच्छा स्वीकारणार आहेत.