फलटण प्रतिनिधी -
विश्वासराव भोसले तुम्ही आयएएस असला तरी मी पण एलएलएम आहे हे विसरू नका, सर्व सभासदांदेखत चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे वतीने एकमताने ठरव करतो तुम्ही ज्यांचे नेतृत्व मानता त्यांना विचारून मला तुमचे अफिडीवेट रात्री मेल करा अन न्यायालयातील याचिका मागे घ्या व होऊन जाऊद्या निवडणूक असे समोरासमोर फटकारत कारखाना निवडणूक व मतदार यादी बाबत याचिका कर्ते निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांची स्टेजवरच गोची करून एका दगडात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विश्वासराव भोसले यांची कोंडी केली व आम्ही कधीही निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे स्पष्ट निर्देश रामराजे यांनी दिले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना 70 व्या सर्वसाधारण सभेत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराज भोसले,निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले,पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्माताई भोसले, माजी सभापती शंकरराव माडकर,व सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक सी.डी. तळेकर उपस्थित होते.
यावेळी सभेचा इतिवृतांत डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रास्ताविक करून मांडला यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले, यावेळी अध्यक्षांचा परवानगी ऐनवेळी येणारे विषयावर चर्चा करताना न्यायालयीन याचिककर्ते माजी सनदी अधिकारी तथा भाजपचे नेते विश्वासराव भोसले यांनी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर अनेक प्रश्नांचा बढिमार केला त्यास शेंडे यांनी उत्तरे ही दिली मात्र भोसले यांचे काही समाधान झाले नाही शेवटी ही लढाई हातगाईवर येतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होण्या अगोदरच श्रीमंत संजीवराजे यांनी विश्वासराव भोसले यांच्याकडे आपला मोर्चा वळवीला अन एकच प्रश्न विचारला की तुम्ही राजाळे सोसायटी चालवीता त्यात मयत सभासद आहेत की नाहीत तेव्हा भोसले म्हणाले आहेत मग ते काय अन कारखान्यातील मयत सभासद काय ते आपण स्वतःहून कमी करू शकत नाही त्यासाठी त्या दुःखद घटना घडलेल्या वारसानी येऊन वारस नोंद करायची असते असे ठणकावून सांगत विश्वासराव भोसले यांच्यावर अक्षरशः प्रहार केला यावेळी मात्र काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
- यावेळी मात्र निवडणूक कधी लागेल माहिती नाही मात्र आत्तापासूनच विरोधक व सत्ताधारी मात्र आमनेसामने आल्याने येणारी पंचवार्षिक निवडणूक मात्र काटे की टक्कर होईल अशी शक्यता निर्माण झाली असून आता विश्वासराव भोसले इथून पुढे कोणती भूमिका घेणार तसेच सत्ताधारी राजेगट त्यांनी दाखल केलेल्या याचिकेला कोणते कायदेशीर उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे मात्र या सभेत अगदीच सत्ताधारी गट विश्वसराव भोसले यांच्यावर अक्षरशः तुटून पडला होता मात्र सभेत कोणी विरोधक सभासद भोसले यांच्या बाजूने उभे राहिले नाहीत मात्र इथून पुढे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील किंवा श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर भोसलेंची साथ देणार? का याचिकाकर्ते विश्वसराव भोसले माघार घेणार अशी चर्चा फलटण तालुक्यात रंगली आहे.
265 ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील ऊस तोडीचा अन्याय कधी दूर होणार?
सभेतील रंगलेले विषय -
आमचा ऊस गुलाल टाकूणच कारखाना आणतो कधीतरी आमचा ऊस टनेज घटण्याच्या आगोदर तोडा चेअरमन
श्रीदत्त इंडिया कारखान्यापेक्षा 50 रुपये दर नेहमीच कमी असतो तो चालू वर्षी त्यांच्या बरोबरीने मिळावा शेतकऱ्यांनी केली मागणी
मुलांना नोकऱ्या दिल्यात मात्र पर्मनंट नसल्याने कोणी मुली देत नाहीत त्यांची लग्न होत नाहीत त्यामुळे त्यांना पर्मनंट करावे केली शेतकऱ्यांनी मागणी