फलटण प्रतिनिधी -
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व गावांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाश्वत विकासासह सशक्त पंचायत निर्माण करुण लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले. ते फलटण तालुकास्तरीय पंचायतराज अभियान व महसुली सेवा पंधरावडा शुभारंभ कार्यक्रम मौजे राजाळे ता.फलटण येथे बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, पंचायतराज अभियानाचे संपर्क सचिव तथा जिल्हा परिषद मुख्य लेखा-वित्त अधिकारी राहुल कदम, लेखा अधिकारी समाधान चव्हाण, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार सौ देवकाते मॅडम, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, मंडळ कृषी अधिकारी बरड स्वप्निल बनकर आदि मान्यवर उपस्थित होते.
गावे समृद्ध झाल्याशिवाय राज्य आणि देश समृद्ध होणार नाही. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान होत असल्याचे सांगून यामध्ये एकूण २४८ कोटी इतक्या रकमेची १९०० बक्षिसे गावांना दिली जाणार असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
पुढे बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत योजना कार्यरत करून यातील आरोग्य, शिक्षण,उपजीविका इत्यादी बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. याशिवाय अभियानात सामाजिक न्याय, उमेद व बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला लखपती दीदी करायच्या असून एक व्यक्ती एक झाड उपक्रमातून पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी आपली असल्याचे पाटील म्हणाले.
आमदार सचिन पाटील यांनी स्वच्छ गाव हरित गाव, अपारंपारिक ऊर्जासह सोलर गाव, सोलर सहीत घरकुल योजना, महसूल आणि ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सुविधा, गावात सीसी टीव्ही कॅमेरे या महत्वाच्या कामाबरोबरच आयुष्यमान भारत व अग्रीस्टॅक, लोकवर्गणीतून विशेष प्रकल्प करणे, शुद्ध पाण्याचा पुरवठा, सूक्ष्म सिंचन, ग्राम स्वच्छता, प्लास्टिक बंदी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मनरेगा अंतर्गत शोष खड्डा, नवीन विहीर, शेततळी, दगडी बांध, जनावरांचा गोठा, तुतीपालन, कुक्कुटपालन, बायोगॅस, शेळीपालन, वर्मी कंपोस्ट, कांदा चाळ यांचे नियोजन प्रभावीपणे करण्याचे सुतोवाच केले.
राजाळे गाव हे समृद्ध पंचायत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मी दत्तक घेतल्याचे आमदार सचिन पाटील यांनी जाहीर केले. हे गाव राष्ट्रपती पदक विजेते असल्याने एकात्मिक विचाराने यावेळी देखील राज्यस्तरावर गावास निश्चित पुरस्कार मिळेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
महसुली सेवा पंधरवडा निमित्त प्रांत अधिकारी सौ प्रियांका आंबेकर यांनी पानंद रस्ते, ७/१२ मधील अडचणी, रेशनिंग , संजय गांधी, जातीचे/उत्पन्नाचे दाखले, पोट खराब क्षेत्र, भूमीहीन बेघर घरकुलधारकांना जमिनी देण्याचे जाहीर केले. यासाठी पंधरावड्यात ग्रामस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सरपंच सौ कविता महिपाल, माजी सरपंच सौ. सविता शेडगे, सौ स्वाती दोंदे, सौ. पद्मावती शेडगे, माजी सरपंच मोहनराव सुतार, उपसरपंच प्रेमचंद भोईटे, सोसायटी चेअरमन नीलकंठ धुमाळ, माजी चेअरमन मारुती जाधव, संपतराव जाधव, गणपतराव निंबाळकर, व्हा.चेअरमन बापुराव देशमुख, सर्व सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील महेश शेडगे, सौ अश्विनी शेडगे, बचत गटाच्या महिला पदाधिकारी, केंद्र शाळा प्रमुख सौ छाया भोसले, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी कैलास जाधव, डॉ. पारवे पाटील, आशा/अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी आनंदराव गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन व आभार निळकंठ धुमाळ यांनी मानले.