फलटण प्रतिनिधी :
येथील ह. भ. प. अर्जुनराव आनंदराव कापसे महाराज यांचे धार्मिक क्षेत्रातील कार्य, मुलांवर भक्तीचे संस्कार, सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन अशा विविध सामाजिक व धार्मिक कार्यासाठी फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी कापसे महाराज यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी फलटण नगर परिषदेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ह. भ. प. अर्जुनराव आनंदराव कापसे महाराज हे दर महिन्याला आळंदी ते पंढरपूर नित्य नियमाने एकनिष्ठपणे पांडुरंगाची वारी करीत असतात. मानवाला भक्ती शक्तीचे मूळवर्म कळावे म्हणून प्रतिवर्षी १५ वर्षे वयोगटाच्या आतील मुलांवर भक्तीचे संस्कार होणेसाठी हरिपाठ पाठांतर स्पर्धा घेतात. तर शक्तीचे संस्कार होणेसाठी सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन देखील करता व यातून तरुणांना एक नवीन संजीवनी व आत्मविश्वास मिळतो. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री च्या निमित्ताने अखंड नामजप यज्ञ व लोकांच्यात भक्तीची आवड निर्माण व्हावी याकरिता श्री. भारुड व ब्रम्ह सत्य कळावे म्हणून तृती वर्णी श्रीमत भागवत कथेचे देखील आयोजन करतात. मागील १५ ते २० वर्षांपासून कापसे महाराज अखंडपणे हे धार्मिक व सामाजिक कार्य करीत आहेत.
आपल्या हातून देशहिताचे समाजकार्य असेच अखंडितपणे सुरु रहावे अशी अपेक्षा आमदार सचिन पाटील यांनी ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान करीत असताना व्यक्त केली.