फलटण प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे या संस्थेकडून देण्यात येणारा मा.वसंतरावदादा पाटील स्मृति पुरस्कार सन 2025 हा फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीला नुकताच पुणे येथे प्रधान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे चे सभापती प्रविणकुमार नाहाटा, उपसभापती संतोष सोमवंशी, कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती ॲड.सुधीर कोठारी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्कृष्ठ कार्य करणारी बाजार समिती म्हणुन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार फलटण बाजार समितीला मिळाला आहे. समितीस यापूर्वी वसंतरावदादा पाटील स्मृति पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग (स्मार्ट)- जिल्ह्यात सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक, कोल्हापुर विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक तर नवराष्ट्र नवभारत टाइम्स चा बेस्ट APMC पुरस्कार यापूर्वी मिळाले आहेत.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे कल्पक दृष्टीकोनातुन कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथे शेतकरी केंद्रबिंदू मानुन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या विविध शेती विषयक समस्यांची सोडवणुक करुन, शेतमालाला जास्तीत जास्त दर आणि आवक आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवत फलटण तालुक्यात दुसऱ्या हरितक्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेतमालासाठी सक्षम अशी पणन व्यवस्था देवुन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करणेकरिता संचालक मंडळाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणेसाठी सदैव तत्पर राहिलेली आहे.
बाजार समिती संघाच्या सर्व निकषामध्ये फलटण बाजार समितीने गुणवत्तापुर्वक काम केले असुन त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन, लेखापरिक्षण, दोष दुरुस्ती, शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा, चालु वर्षात उत्पन्नामध्ये वाढ, वृक्षारोपण व शासनाच्या ऑनलाईन सुविधेमध्ये भाग घेवुन ई-नाम कामकाज राबविणे इ.कामे केली असलेने उत्कृष्ठ कार्य करणारी बाजार समिती म्हणुन सन्मानित करणेत आले.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने समितीच्या वतीने समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, संचालिका सौ. जयश्री सस्ते, संचालक टी.डी.शिंदे, सचिन लोखंडे, शंभुराज पाटील, प्रविण खताळ, चांगदेव खरात,अक्षय गायकवाड, संतोष जगताप, संजय कदम,निलेश कापसे तसेच समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आदींनी स्वीकारला.
पुरस्कार मिळालेबद्दल मा.ना.जयकुमार रावल, मंत्री, पणन व राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, दिपकराव चव्हाण माजी आमदार, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा, राज्याचे पणन संचालक विकास रसाळ, जिल्हा उपनिबंधक, सह.संस्था, सातारा, संजयकुमार सुद्रीक विभागीय उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, कोल्हापुर, डॉ.सुभाष घुले, सहाय्यक निबंधक, सह.संस्था, फलटण जे.पी.गावडे यांनी अभिनंदन केले आहे.