फलटण प्रतिनिधी :
तालुक्यातील उपळवे येथे असलेल्या स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड फलटण या कंपनीला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२५ नवी दिल्ली येथे खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार नवी दिल्ली येथे दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या हस्ते स्वराज चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी स्वीकारला. पर्यावरण संरक्षण व उच्च दर्जाची उत्पादन कार्यक्षमता साध्य करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या शुगर इथेनॉल उत्पादक या विशेष श्रेणीत हा पुरस्कार कंपनीला प्राप्त झाला आहे या समारंभाला ऊर्जा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या कष्टाने उपळवे सारख्या डोंगराळ भागात साखर कारखान्याची उभारणी करून हजारो जणांना रोजगार दिला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी इतर कारखान्यांच्या तुलनेत जादा दर दिला.
कंपनीच्या स्थापनेपासून हरित ऊर्जेच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे दूरदृष्टीचे उद्योजक म्हणून ते ओळखले जातात. व्यवस्थापन, संचालक म्हणून देवेंद्र देशपांडे धोरणात्मक निर्णय आणि शाश्वत विकास यामध्ये काम करीत आहेत. डिस्टिलरी महाव्यवस्थापक संजय पवार उत्पादन क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य व कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगदान देत आहेत. स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड कंपनी साखर कारखान्याशी संलग्न डिस्टिलरी प्रकल्पाद्वारे इथेनॉल उत्पादन करते. इथेनॉल उत्पादनामध्ये अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन प्रक्रियेत कमी ऊर्जा वापरून जास्त उत्पादन साध्य करत आहे. औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारा कचरा व सांडपाणी याचे योग्य व्यवस्थापननेट झिरो कार्बन एमिशन ध्येय साध्य करण्यासाठी सततची धडपड कंपनीच्या या प्रयत्नांमुळे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम अंतर्गत देशाच्या ऊर्जा सुरक्षेला हातभार लागतो तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळते. या सन्मानामुळे स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेडला देश विदेशातील हरित ऊर्जा उद्योगामध्ये नवे स्थान प्राप्त झाले आहे.