फलटण │ शारदीय नवरात्रोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवीची उपासना, जगरात, भजन-कीर्तन याबरोबरच नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची परंपरा सध्या मोठ्या उत्साहाने पाळली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भक्तांनी आपल्या पेहरावात, सजावटीत व दैनंदिन जीवनात हे रंग वापरावेत, अशी परंपरा आहे.
भक्तगण या नऊ दिवसांत देवीची आराधना करताना या रंगांचा अंगरखा, साडी, ड्रेस, दागदागिने किंवा सजावटीत वापर करून उत्सवात सहभागी होतात. सामाजिक माध्यमांवरही हा ट्रेंड दिसून येत आहे.
नवरात्री २०२५: सध्याची दिवसानुसार रंगांची यादी
दिवस तारीख रंग
दिवस १ 22 सप्टेंबर पांढरा (White)
दिवस २ 23 सप्टेंबर लाल (Red)
दिवस ३ 24 सप्टेंबर रॉयल ब्लू (Royal Blue)
दिवस ४ 25 सप्टेंबर पिवळा (Yellow)
दिवस ५ 26 सप्टेंबर हिरवा (Green)
दिवस ६ 27 सप्टेंबर राखाडी / ग्रे (Grey)
दिवस ७ 28 सप्टेंबर नारिंगी / केशरी / ऑरेंज (Orange)
दिवस ८ 29 सप्टेंबर मोर हिरवा / Peacock Green
दिवस ९ 30 सप्टेंबर गुलाबी / पिंक (Pink)