फलटण : सचिन मोरे
फलटणच्या राजकारणात सध्या “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वरवर शांतता भासली तरी आतून मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय नेते मंडळी मात्र हवालदिल झाले असून राजकीय कोलांट उड्या मारणारांची गोची झाल्याचे बोलले जात आहे.
कोणी कोणाला भेटतंय, कोण कुणाला पाठिंबा देतोय, याबद्दल उघडपणे कोणी बोलत नाही. पण राजकीय रंगमंचावर मात्र सगळं कबूल.. कबूल.. झाल्यासारखं सुरू असल्याचं जाणकार सांगतात.
दोन्हीही निंबाळकर गट सर्वांचे नेते जणू एकमेकांशी “बोलू नका, भेटू नका अशा भूमिकेत आहेत. कोण कुठल्या गाडीत बसणार, कुठे जाणार, कोणाच्या बरोबर उभं राहणार याकडे कार्यकर्त्यांची चांगलीच उत्सुकता लागली आहे. पण कार्यकर्त्यांना मात्र अंधारात ठेवले आहे. वरच्या पातळीवर ‘डील’ होत असतानाच खालील कार्यकर्त्यांना मात्र नेमकी दिशा नाही. “नेमकं आम्ही कुणासाठी sloganeering करू? असा सवाल अनेक कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
फलटणच्या राजकारणातील या शांततेतूनच मोठा वादळाचा इशारा दडला असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. “तेरी भी चूप, मेरी भी चूप” या राजकीय खेळीमुळे आगामी निवडणुकीत अनपेक्षित समीकरणं घडण्याची दाट शक्यता आहे.
लवकरच भेटू... एक कविता धैर्य टाईम्स च्या वाचकांसाठी घेऊन....