फलटण प्रतिनिधी - येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या सायन्स अकॅडमी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण व मानसिक त्रास झाला असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थी व त्याच्या पालकांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत शहर पोलीस स्टेशन करून मिळालेली हकीकत अशी, फलटण येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या सायन्स अकॅडमी मध्ये संबंधित विद्यार्थी शिक्षण घेत होता. रविवार दिनांक 27 जुलै रोजी साप्ताहिक चाचणी असल्यामुळे विद्यार्थी अकॅडमी मध्ये गेला होता. दरम्यान चाचणी सुरू असताना काही विद्यार्थी गोंधळ करत होते, त्यावेळी संबंधित विद्यार्थ्याला उपस्थित शिक्षकाने तोंड धरून हाताने मारहाण केली. मारहाण केल्याची माहिती विद्यार्थ्याने आपल्या पालकांना दिल्यानंतर पालक शिक्षकांना भेटण्यासाठी अकॅडमीत आले असता त्यांची भेट होऊ शकली नाही.
दरम्यान 28 जुलै रोजी अकॅडमीतील शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्याला अकॅडमी मध्ये काय होत आहे हे घरी सांगायचे नाही तू चुकलास तर शिक्षक तुला मारणारच असे बोलण्याचा मानसिक त्रासातून त्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर सायंकाळच्या सुमारात नायलॉनची दोरी घेऊन गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या प्रसंग सावधतेने मुलाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. परंतु मानसिक त्रास झालेले संबंधित शिक्षकांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.