फलटण प्रतिनिधी :
गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी फलटणच्या बारामती शाखेचे उदघाटन प्रमोद दुरगुडे असिस्टंट रजिस्टर, बारामती, यांच्या हस्ते पार पडला सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनिजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन सचिन यादव होते यावेळी वरिष्ठ अधिकारी अशांत साबळे, गणेश निकम, हेमंत खलाटे, योगेश यादव, संदीप शिंदे यांची उपस्थिती होती.
सचिन यादव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व अथक परिश्रमांमुळे गॅलेक्सी म्हणजे विश्वास ही ओळख झाली आहे. त्यांच्या प्रेरक मार्गदर्शनामुळे गॅलेक्सी परिवाराने सतत प्रगती साधली आहे, तर सभासद आणि ग्राहकांचा विश्वास, सहकार्य आणि पाठबळ हेच संस्थेचे बळ ठरले आहे.
के. बी. एक्सपोर्टच्या माध्यमातून गॅलेक्सी अनेक शेतकऱ्यांशी जोडली गेलेली असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सतत कार्यरत आहे. सध्या गॅलेक्सीची सभासद संख्या १०,००० पेक्षा अधिक असून, ५४ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे यशस्वी वितरण झाले आहे. एकत्रित व्यवसायाची रक्कम ९८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. फलटण, राजाळे, साखरवाडी आणि पिंपरी चिंचवड येथे शाखा कार्यरत असून, बारामती येथे नव्या शाखेचे भव्य उद्घाटन झाले आहे. संस्थेने १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना स्थिर रोजगाराची संधी दिली आहे.
गॅलेक्सीने सलग चार वर्षे बँको ब्ल्यू रिबिन पुरस्कार पटकावून उत्कृष्ट सेवा सिद्ध केली आहे. तर सतत ‘ऑडिट वर्ग अ’ दर्जा टिकवला आहे. प्रत्येक शाखेत अत्याधुनिक गोल्ड टेस्टिंग मशीनची सुविधा उपलब्ध असून ५ मिनिटात सोने तारण कर्ज वितरण केले जाते, संस्थेचा एन.पी.ए. १% पेक्षा कमी ठेवून आर्थिक स्थैर्य आणि विश्वास दृढ केला आहे. एकूण कर्जांपैकी ५०% पेक्षा अधिक सुरक्षित सोने तारण कर्ज स्वरूपात दिले गेले आहे, ज्यामुळे सभासदांना त्वरित व विश्वासार्ह आर्थिक मदत मिळते.
गॅलेक्सीचे सर्व उपक्रम नफा कमावण्यापुरते मर्यादित नसून, ते समाजहित आणि प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, समाधान आणि प्रगती घडविण्यासाठी उद्देशीत आहेत. या प्रसंगी चेअरमन सचिन यादव यांनी लवकरच गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टिपर्पजचे कामकाज बारामतीत सुरू करणार असल्याचे जाहीर केले.