फलटण | धैर्य टाईम्स |
मला महाराज साहेबांचा आदर आहे मी कायमच त्यांचा आदर करतो मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे हे बोल आहेत खासदार गटाचे कट्टर समर्थक सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचे. काही दिवसांपासून तालुक्यामध्ये खासदार गट व राजेगट यांचे patchup झाल्याच्या चर्चेने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच काल झालेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत खासदार गटाचे कट्टर समर्थक सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांना मंचकावर बसवण्यात आले. राजे गटाच्या ताब्यात असणाऱ्या श्रीरामच्या सभेत खासदार गटाचे विश्वासराव भोसले मंचकावर बसल्यानंतरच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
श्रीरामच्या वार्षिक सभेत बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांची परवानगी घेत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन घ्यायचे असेल तर रिट पिटीशन दाखल करणारे विश्वासराव भोसले यांना आपण विनंती करू की त्यांनी ते मागे घ्यावे असा ठराव मांडला. रामराजेंनी भोसले यांना यावर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले, त्यावर विश्वासराव भोसले म्हणाले, आदरणीय महाराज साहेबांचा आदर नेहमीच आहे. त्याबाबतीबद्दल मी तुमच्या बरोबर आहे महाराज साहेबांच्या बरोबर आहे. काही टेक्निकल गोष्टी मी व्हाईस चेअरमन यांच्याबरोबर बोललो आहे त्या आपण दुरुस्त करू या आणि पुढे जाऊया.
विश्वासराव भोसले यांच्या या विधानाने पुन्हा एकदा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून राजकारणामध्ये नक्की कोण कोणा बरोबर आहे, तिसरी आघाडी होणार का ? असे तर्क वितर्क लढविले जात आहेत.