फलटण :
रविवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने फलटण शहराला अक्षरशः झोडपून काढले. आठवडा बाजार सुरु असतानाच झालेल्या पावसामुळे विक्रेते आणि ग्राहकांची मोठी धांदल उडाली. काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने बाजारपेठेत चिखल व पाण्याचे तळे तयार झाले.
पावसाच्या झोकात भाजीपाला, कपडे, किराणा साहित्य विक्रेते आपापले स्टॉल वाचवण्यासाठी धावाधाव करताना दिसले. अनेक ठिकाणी माल ओला होऊन नुकसान झाले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
नागरिकांनी नगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, “प्रत्येक पावसात अशीच परिस्थिती निर्माण होते, नाल्यांची साफसफाई का केली जात नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे.
पावसाचं पाणी बाजाराच्या रस्त्यांवर साचलं, पायरीभर चिखल झाला, आणि ग्राहकांनी छत्री धरून घराचा रस्ता धरला. काही लहान मुलं मात्र या सरींमध्ये आनंदाने भिजताना दिसली त्या दृश्याने वातावरणात थोडीशी मृदू झुळूक आणली.