फलटण प्रतिनिधी -
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 मध्ये विडणी गाव स्पर्धेत राहण्यासाठी महास्वच्छता अभियान उद्या गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ ते अकरा यावेळेत होणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली.
सदरचे महास्वच्छता अभियान शासनाच्या नियोजनानुसार होणार असून गावात महा श्रमदान अभियानातून गावातील ओडे नाले व गटारी स्वच्छ केले जाणार आहेत. त्यांचबरोबर रस्ते दुरुस्ती व रस्ते मुरमीकरण केले जाणार आहेत. गावच्या लोकसंख्येएवढे नव्याने वृक्ष लागवडीचा देखील याच वेळी शुभारंभ होणार असल्याची माहिती शेवटी सरपंच सागर अभंग यांनी दिली आहे. विडणी गावातील सर्व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.