पत्रकारांचे माझ्या बोलण्याकडे लक्ष लागून राहिले आहे मात्र मी आज काहीच बोलणार नाही आज फक्त अन फक्त वाढत्या त तापमानाबद्दल बोलणार राजकीय वातावरण तापवणार नाही : रामराजे
फलटण प्रतिनिधी - पर्यवारणाचा समतोल राखता आला नाहीतर मुसळधार पावसाने बांधलेली धरणे फुटतील नाहीतर नव्याने बांधलेली धरणे कोरडी राहतील असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले यामुळे सर्वच संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे लागेल अन्यथा पुढच्या पिढीला खूप मोठा धोका होईल असेही स्पष्ट केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे,फलटण तालुका दूध संघांचे चेअरमन धनंजय पावर, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्माताई भोसले, व्हाईस चेअरमन भगवान होळकर जेष्ठ नेते चंदू काका रणवरे, श्रीराम बाजार चे चेअरमन जितेंद्र पावर, संचालक अनिल बापू रणवरे,तसेच सर्व संचालक संचालिका यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे यांनी सांगितले की सध्या आपण पाहतोय ऐकतोय की जिथं पाण्याची टंचाई निर्माण होते तेथे ढगफुटी होत आहे तर कुठं ओला दुष्काळ तर कोरडा दुष्काळ पडतोय यामुळे नक्कीच पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी बाजार समिती असेल किंवा कोणत्याही संस्था तसेच सामाजिक कार्य करणारे असतील त्यांनी पुढे आले पाहिजे व पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी कार्य केले पाहिजे अन्यथा यापुढील भविष्यातील पिढी नक्कीच अडचणीत येईल असे सांगितले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले सुरु असून ते आपण नाहीतर त्यावर काम करणाऱ्या संस्था व राज्य सरकार म्हणत असून लागोपाठ तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून एक ऐतिहासिक इतिहास सुवर्णक्षरांनी लिहिला असून यापुढेही असेच उत्तम असे काम शेतकरी हमाल मापाडी यांच्या हिताचे करीत राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की आम्ही सर्वजन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून यापुढेही असेच काम पुढे करीत राहू आज बाजार समितीने सात पेट्रोल पंप सुरु असून खाटीक समाजाच्या मागणीनुसार तारडगावं येथे लवकरच शेळी मेंढी बाजार सुरु करणार आहोत त्याचबरोबर सध्या या ठिकाणी मोठे रुग्णालय उभारले जात आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत व अल्पदरात उपचार केले जाणार असून त्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत यापुढेही अशीच शेतकऱ्यांना उपयोगी असे प्रकल्प उभारून तरुणांना रोजगाराच्या संधी तसेच शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअर उभारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी आम्हाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सतत मार्गदर्शन करावे आम्ही आमच्या चुका काढा म्हणून विरोधकांना सुद्धा या सर्वसाधारण वार्षिक सभेस बोलावले होते मात्र त्यांनी सांगितले की आम्हाला काहीच चूक वाटत नाही त्यामुळे त्यांनी वार्षिक सभेस येण्याचे टाळले असे स्पष्ट करीत विरोधकांना चिमटे काढले.
सचिव शंकरराव सोनवलकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले तर सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन भगवान होळकर यांनी मानले यावेळी नव्याने विशेष निमंत्रित सदस्यांचे सत्कार मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक सभेला सर्व संचालक, सभासद, संस्थांनाचे प्रतिनिधी, हमाल मापडी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.