Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 


 फेसबुकद्वारे केलेली जाहिरात वाचून फलटण येथील एकाचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड भाडयाने करार करून फसवणूक केली होती. सदर ट्रॅक्टर व पोकलॅण्ड आरोपीने परस्पर विक्री करून फिर्यादीची फसवणूक केली होती. सदरचे दोन्ही ट्रॅक्टर व पोकलॅण्ड जप्त करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले.


यासंबंधी फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, फलटण येथील विनय संपत माने यांनी फेसबुकद्वारे ट्रॅक्टर भाडयाने दिले जातील या बाबतची जाहिरात दिल्याने कर्नाटकातील इसम नामे मुस्ताक मोहम्मद हुसेन याने विनय संपत माने यांस आमच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड भाडयाने करार करून कर्नाटक येथे घेऊन गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी ठरल्याप्रमाणे भाडे घेण्यासाठी संपर्क साधला असता, आरोपी याने मोबाईल फोन बंद केला व त्याने दिलेला पत्ता व सरकारी कामाची वर्क ऑर्डर खोटी असल्याचे लक्षात आले या वरून फलटण शहर पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दाखल गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेशाने फलटण शहर पोलीस ठाणेकडील तपास पथक यांनी आरोपीचा कर्नाटक, महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी शोध घेतला असता बातमी दारामार्फत आरोपी मुस्ताक मोहम्मद हुसेन यांस नायगांव मुंबई येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता सदर आरोपी व त्याचा साथीदार इदमा हबीब रहेमान कुंजी बिहारी, राहणार कनार्टक यांनी शेतक-यांकडून ट्रॅक्टर व पोकलॅन घेऊन खोटया कागदपत्राच्या आधारे दुस-या राज्यात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले यावरून आरोपी नामे इदमा हबीब रहेमान कुंजी बिहारी यांस कनार्टक राज्यातून ताब्यात घेऊन गुन्हयातील फसवणूक करून नेलेले ट्रॅक्टर व पोकलैंड तामीळनाडू राज्यातून हस्तगत करणेत आले आहेत. नमूद आरोपी हे शेतक-यांना सरकारी कामाच्या खोटया वर्क ऑर्डर दाखवून शेतक-यांकडून ट्रॅक्टर पोकलैंड इत्यादि वस्तु घेऊन दुस-या राज्यात विकणारी आंतरराष्ट्रीय टोळी आहे.


 फलटण शहर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने आरोपी नामे (१) मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन वय ३८ वर्षे रा. वासावी स्कुलच्या मागे काझी मोहल्ला, वी.टि.सी चित्रदुर्ग, जिल्हा चित्रदुर्ग राज्य कर्नाटक (२) इदमा हबिब रेहमान कुंजी बियारी वय ६४ वर्षे रा- १-८५, अहुर, ठाणा- मुडबिंद्री, ता मॅन्गलौर जि दक्षिण कन्नडा राज्य कर्नाटक यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन जॉईंडिअर कंपनीचे ट्रॅक्टर, एक लुगॉन कंपनीचे पोकलैंड असा एकुण ६५,००,०००/- रुपये (पासष्ट लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल कनार्टक तामीळनाडु व महाराष्ट्र राज्यांमध्ये तपास करुन जप्त करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अपर अधीक्षक सातारा, विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, विजयमाला गाजरे, पोलीस उपनिरीक्षक, संतोष कदम सहा. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार पूनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER