फलटण | धैर्य टाईम्स |
गणपती विसर्जन वेळी निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात एकमेकांवर दगडफेक करण्यात आली याप्रकरणी १५ जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरारी आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जिंती नाका, फलटण येथे संशयित आरोपी १) विशाल पांडुरंग माळी, २) देविदास बापु माळी, ३) संपत भरत माळी, ४) अजय पांडुरंग माळी, ५) रंगराव भरत माळी, ६) अमर राजु माळी, ७) नेताजी प्रकाश माळी, ८) प्रकाश काळुराम माळी, ९) अमोल आकाराम मोरे, १०) रमेश संजय माळी, ११) अजय रघुनाथ माळी, सर्व रा. सगुणामातानगर, मलठण, ता. फलटण, जि. सातारा व जयभवानी तरूण गणेश मंडळ कुंभारभट्टी फलटण या मंडळातील संशयित आरोपी १२) एक अल्पवयीन मुलगा १३) सुशांत सुनिल जुवेकर, १४) शंकर रामराव जुवेकर, सर्व रा.महतपुरापेठ, ता. फलटण, जि. सातारा, (१५) अजय संजय जाधव, रा.स्वामी समर्थ मंदिर मलठण, ता. फलटण यांना पो.हवा संदिप दिलीप लोंढे मलठण, यांनी वाद करू नका, तसेच भांडणे करू नका, असे सांगून तुमची काय तक्रार असेल ती पोलीस स्टेशनला जावुन द्या असे त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी काही एक न ऐकता फिर्यादी यांच्या समक्ष तेथील दगडे उचलून एकमेकांना मारण्यास सुरूवात करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी पो.हवा संदिप दिलीप लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरारी आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास म.पो.हवा. अश्विनी चव्हाण करत आहेत.