फलटण : सचिन मोरे
स्थानिक राजकारणात सतत रंग बदलणारे समीकरण आता पुन्हा एकदा गोंधळात टाकणारे ठरत आहे. अलीकडच्या बैठकीत “नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू...” हा संवाद उघडपणे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकीकडे काही नेते स्वतःचे अस्तित्वासाठी स्वतंत्र गाडी शोधू लागले आहेत, तर दुसरीकडे मोठ्या नेत्यांच्या सावलीत बसून राजकीय व व्यावसायिक भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
फलटणच्या राजकारणात नवीन खेळी, नव्या संगती आणि अनपेक्षित पॅचअप्स दिसण्याची शक्यता नाकारता येत नसले तरीही मोठ्या नेत्यालाच आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वतःचे श्रेष्ठत्व नाकारून "दादा"गिरी सहन करावी लागत असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
अनेक दिवसांपासून राजकीय चर्चेत राहिलेल्या "त्या" प्रवेशाबाबत वरिष्ठांकडून अटी व शर्ती नाकारल्यास नकार येऊ शकतो असे वृत्त आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी, स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आणि सध्याच्या समीकरणांना धक्का लागेल या भीतीमुळे पक्षाने अखेर WAIT ची मुद्रा दाखवली असल्याचे सांगितले जाते आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याचा संवाद हा केवळ वाक्य नाही तर आगामी राजकीय हालचालींचा ठोस इशारा आहे. “नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू...” – या एका वाक्याने फलटणचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
त्या राजकीय पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नसली असली तरीही पडद्यामागे मोठी हालचाल सुरू असल्याचे बोलले जाते. यामुळे " त्यांचे " पुढील पाऊल काय असणार? हा प्रश्न आता फलटणच्या राजकारणात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.