फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा दलित समाजाचे जेष्ठ नेते हरिष चंदरराव काकडे तथा नाना यांचे आज रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता फलटण येथे दुःखद निधन झाले. आज रविवारी दुपारी २.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सामाजिक व सहकार क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात नानांनी काम केले होते. दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण, सातारा जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ लि., सातारा, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि., फलटण, फलटण सहकारी शेतमाल प्रक्रिया संस्था लि., फलटण, फलटण कॉटन सेल, जिनिंग अँड प्रेसिंग को - ऑप. सोसायटी लि., फलटण आदी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून तसेच फलटणचे नगरसेवक म्हणून बु. हरिष काकडे तथा नाना यांनी फलटण तालुक्याच्या सहकार व सामाजिक क्षेत्रात तत्कालीन आमदार डॉक्टर कृष्णचंद्र भोईटे यांच्या समवेत केलेले काम विसरता येणारे नाही.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.