फलटण प्रतिनिधी | ५ जून २०२५
फलटण शहर आणि तालुक्यात उपविभागीय अधिकारी धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे डॉशिंग पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा आणि फलटण ग्रामीणचे तडफदार पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक साहेब यांचा वचक असून सुद्धा फलटण शहर आणि तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट होत असल्याचे भाजप अनुसूचित जाती सेलचे फलटण शहर उपाध्यक्ष विकी बोके यांनी म्हटले आहे.
फलटण शहरात आणि तालुक्यातील अनेक भागात दारू,जुगार,मटका, ताडी, गांजा यांचा खुलेआम बाजार सुरु आहे तरी या अवैध धंद्याकडे या अधिकाऱ्यांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप बोके यांनी केला आहे.तर हे मुद्दाम करत आहे की यांना कोणाचे पाठबळ आहे हे शोधणे गरजेचे आहे असल्याचे शेवटी विकी बोके यांनी म्हटले आहे