फलटण प्रतिनीधी :
लाच मागणी संबंधी तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं. ५२४/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार, सातारा येथे अथवा ९५९४५३११००, ९७६३४०६५०० कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२३८१३९ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ या क्रंमाकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा पोलीस उपअधिक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी केले आहे.
विडणी तालुका फलटण येथील महावितरण शाखा अभियंता याने वरिष्ठ तंत्रज्ञ याच्याकडूनच ३ हजार रुपयांची मागणी केली असता २ हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार हे वरिष्ठ तंत्रज्ञ म रा वि वि कं मर्या. शाखा विडणी ता. फलटण येथे नेमणूकीस आहेत. त्यांच्याकडे झिरपवाडी व भाडळी बु|| या गावाचा चार्ज आहे. तक्रारदार हे लोकसेवक असून त्यांच्याकडे प्राप्त ग्राहकांची नवीन विज कनेक्शन प्रकरणे मंजूर करून मिटर देण्यासाठी सदाशिव अशोक गंगावणे (वय 45 वर्ष, मूळ राहणार प्लॉट नंबर 401 लोटस रेसिडेन्सी धानोरी रोड लोहगाव पुणे 47 सध्या राहणार महावितरण फलटण कार्यालयाच्या पाठीमागे गणपती मंदिर शेजारी फलटण जिल्हा सातारा) यांनी प्रत्येक प्रकरणामागे १ हजार रूपये प्रमाणे तीन प्रकरणाचे ३ हजार रूपये लाचेची मागणी केली व तडजोडी अंती २ हजार लाचेची रक्कम स्विकारताना दिनांक २२ रोजी दुपारी फलटण येथे स्विकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले असुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरण शाखा अभियंता सदाशिव अशोक गंगावणे यास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक २ ला.प्र.वि. पुणे.विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा पोलीस उपअधिक्षक राजेश वसंत वाघमारे,सचिन राऊत, पोलीस निरीक्षक, विक्रम पवार, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. सातारा, पो.हवा. गणेश ताटे, पो.कॉ. तुषार भोसले, पो.कॉ. निलेश येवले, पो.हवा. नितीन गोगावले, पो.हवा निलेश राजपुरे, म.पो.शि.स्नेहल गुरव, म.पो.कॉ. शितल सपकाळ सर्व ला.प्र.वि. सातारा यांनी केली आहे.