फलटण (प्रतिनिधी) :
येत्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये महिलांमधून एक नाव चर्चेत आले आहे माजी नगरसेविका सौ.वैशाली सुधीर अहिवळे! घरात दोन पिढ्यांचा राजकीय वारसा असलेल्या या महिला उमेदवाराने स्थानिक राजकारणात आधीच चांगला दबदबा निर्माण केला आहे.
त्यांचे सासरे कालकथित तानाजीराव अहिवळे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यासुद्धा फलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. म्हणजेच घरात राजकारणाची शिदोरी आणि जनतेच्या विश्वासाचा ठेवा दोन्ही आहे.
भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अशा कार्यक्षम, प्रभावी आणि लोकांमध्ये कार्याचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असून, प्रभाग २ मध्ये सौ. वैशाली अहिवळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत प्रबळ मानली जात आहे.
त्यांचे पती सुधीर अहिवळे हे स्वतः सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. फलटण शहरातील अनेक सामाजिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, तसेच महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळेच वैशाली अहिवळे यांना स्थानिक स्तरावर मजबूत लोकसंपर्काचा फायदा होत आहे.
स्थानिक स्तरावर त्या महिला मतदारांमध्ये लोकप्रिय असून, त्यांची सामाजिक कार्याची छाप देखील ठळक आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपकडून लढणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये वैशाली अहिवळे हे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
वैशाली अहिवळे यांचे थोरले दिर कालकथित आशिष अहिवळे यांचे सामाजिक कार्य अनेकांना आजही प्रेरणा देते. युवक संघटन हे आशिष यांचे बलस्थान होते. आजही त्यांच्या कार्याने प्रेरित अनेक सहकारी अहिवळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहेत.
राजकीय वर्तुळात प्रभाग २ मधील स्पर्धा रंगणार याबाबत शंका नाही. मात्र फलटणकरांच्या नजरा आता एका महिलेकडे उमेदवारा कडे वळल्या आहेत त्या म्हणजे सौ.वैशाली सुधीर अहिवळे.