फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी प्रसिद्ध केली एकूण १३ प्रभाग असतील त्यापैकी १२ प्रभाग द्विसदस्यीय आणि एक प्रभाग त्रिसदस्यीय असणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीद्वारे एकूण २७ सदस्य निवडून द्यायचे आहेत.
सदर प्रभाग रचनेबाबत नकाशासह सविस्तर माहिती नगरपरिषद कार्यालयात सूचना फलक आणि नगरपरिषद अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध असून त्याबाबत आजपासून दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या हरकती, सूचना नगरपरिषद कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदविता येतील. त्याबाबत सुनावणीसाठी संबंधित नागरिकास नगरपरिषद कार्यालयात पूर्वसूचना देवून बोलाविण्यात येणार आहे.
नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी प्रसिद्ध केल्याप्रमाणे सर्व १३ प्रभागांची रचना खालीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. १: (द्विसदस्यीय) : सोमवार पेठ संपूर्ण, श्रीराम साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर, नगर परिषद पाणी पुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर, लक्ष्मी मरिमाता मंदिर.
प्रभाग क्र. २ (द्विसदस्यीय) मंगळवार पेठ परिसर, एस. टी. बस स्थानक समोरील परिसर, पुणे रस्ता परिसर. प्रभाग क्र. ३ (द्विसदस्यीय) आखरी रस्ता पूर्व बाजू, नायरा पेट्रोल पंप परिसर, उर्दू शाळा, कुरेशी मस्जिद परिसर, बुरूड गल्ली, खाटिक गल्ली, परिट गल्ली.
प्रभाग क्र. ४ (द्विसदस्यीय) : आखरी रस्ता पश्चिम बाजू, पठाण वाडा, पाचबत्ती चौक, लाटकर तट्टी, शनी मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, वेलणकर दत्त मंदिर, दगडी पूल परिसर.
प्रभाग क्र. ५ (द्विसदस्यीय) श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय परिसर, जिंती नाका, गोसावी वस्ती, पुणे रोड परिसर, आईसाहेब मंदिर, हरीबुवा मंदिर, महादेव मंदिर, उंबरेश्वर चौक, स्वामी समर्थ मंदिर, इंदिरानगर वसाहत. प्रभाग क्र. ६ (द्विसदस्यीय) : संतोषी माता मंदिर परिसर, सगुणमाता नगर, साईबाबा मंदिर, श्रीकृष्ण बेकरी परिसर, जिंती नाका पेट्रोल पंप, हॉटेल महाराजा परिसर, निमकर सीडस, बॅ. राजाभाऊ भोसले घर परिसर.
प्रभाग क्र. ७ (द्विसदस्यीय) संत बापूदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्ता दोन्ही बाजू, मुधोजी कॉलेज परिसर, जिनिंग मिल, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल परिसर.
प्रभाग क्र. ८ (द्विसदस्यीय) ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट परिसर, नगरपरिषद आरोग्य केंद्र, पराडकर प्रेस, नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ परिसर, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा, श्रीकृष्ण मंदिर.
प्रभाग क्र. ९ (द्विसदस्यीय) गजानन चौक परिसर, पवार गल्ली, नगरपरिषद परिसर, उमाजी नाईक चौक परिसर, मेटकरी गल्ली, उघडा मारुती मंदिर परिसर, मटण मार्केट, मच्छी मार्केट परिसर, रविवार पेठ तालीम परिसर.
प्रभाग क्र. १० (द्विसदस्यीय) घडसोली मैदान, शिंगणापूर रस्ता, पृथ्वी चौक (अहिल्यादेवी चौक), शिवाजीनगर, खर्डेकर विद्यालय परिसर, रिंग रोड उत्तर बाजू, सुविधा हॉस्पिटल परिसर, जलमंदिर परिसर,
प्रभाग क्र. ११ (द्विसदस्यीय) रायगड हॉटेल परिसर, महात्मा फुले शॉपिंग सेंटर परिसर, माळजाई मंदिर परिसर, सिटी प्राईड परिसर, नारळी बाग परिसर, मुधोजी हायस्कूल परिसर, जोशी हॉस्पिटल परिसर, प्रशासकीय इमारत परिसर.
प्रभाग क्र. १२ (द्विसदस्यीय) स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, आबासाहेब मंदिर मागील बाजू, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर, कामगार कॉलनी, खजिना हौद मागील परिसर.
प्रभाग क्र. १३ (त्रिसदस्यीय) : पद्मावतीनगर, भडकमकर नगर, पोलीस स्टेशन कॉलनी, संजीवराजेनगर परिसर, इरिगेशन कॉलनी परिसर, हाडको कॉलनी, आनंद नगर, गोळीबार मैदान परिसर, विद्यानगर, लक्ष्मीनगर.