फलटण प्रतिनिधी : वडले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.वडले ता. फलटणच्या चेअरमनपदी राजे गटाचे आनंदराव सोनवलकर व व्हा.चेअरमनपदी बबनराव शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.