फलटण : धैर्य टाईम्स
फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून त्याचा सर्व सामान्य नागरिकांना व विशेषतः लहान मुलांना फार त्रास होत आहे. शहरातील चौका चौकात कुत्र्यांचे टोळके व भर रहदारीचे चौकात बेवारस जनावरांचे कळप बसलेले असतात त्यांचा वाहन चालकाना खूप त्रास होत आहे. यापूर्वीही शहरात कुत्र्यांकडून अनेकांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे भटके कुत्री बेवारस जनावरांचा पालिकेने ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा नगर परिषदेच्या इमारत समोर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.
अशोकराव जाधव यांनी पुढे असे म्हटले आहे कि, बेवारस जनावरे शहरातील रस्त्यात नागरिकावर हल्ला करू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकाचा किंवा एखादे लहान मुलांचा जीव गेल्या वर नगर पालिका या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे काय? असा संतप्त सवाल अशोकराव जाधव यांनी नगर प्रशासनाला विचारला आहे.
भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा नगर पालिका प्रशासनाने ताबडतोब आठ दिवसाचे आत बंदोबस्त करावा अन्यथा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्ष या महायुतीचे मार्फत नगर परिषदेच्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेवटी ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.