स्वार्थी राजकारणाकरिता अनेकांनी जीवनातील मूल्यांना तिलांजली देत राजकारण व समाजकारण यशस्वी केले असेलही, परंतु समाजकारण व राजकारणातील मूल्य, आई-वडिलांचे संस्कार, समाजाचे हित ज्यांनी जोपासले आहे असे फलटण शहरातील एकमेव निर्भीड नायक म्हणजेच साप्ताहिक फलटण दर्शनचे संपादक सुधीर तानाजी अहिवळे होय. फलटण नगर परिषदेचे भूतपूर्व उपनगराध्यक्ष दिवंगत तानाजी बाबुराव अहिवळे यांचे चिरंजीव सुधीर हे शहरातील राजकारण, पत्रकारिता व समाजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस...
निर्भीड बाणा, रोखठोक बोलणे, मात्र कोणत्याही क्षेत्रातील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सदैव तयार म्हणजे सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व सुधीर चेअरमन. राजकीय व सामाजिक कार्याचा वसा वडील तानाजीराव व मोठे बंधू आशिष यांच्याकडून घेत कार्याला सुरुवात केली. समाजकारण व राजकारणामध्ये आपला वेगळ्या शैलीमुळे सुधीर यांना चेअरमन या नावाने तालुक्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे.
सुधीर चेअरमन यांनी समाज जीवनामध्ये काम करीत असताना अनेकांना मदतीचा हात दिला. कायम सहकारी मित्र व कार्यकर्ते यांच्या संपर्कात असणारे सुधीर आज भारतीय जनता पार्टीमधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. कायम न्यायाची भूमिका घेणारे सुधीर अहिवळे यांनी समाजात व राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
जनसंपर्क ही सुधीर अहिवळे यांची विशेष जमेची बाजू होय. राजकारण, समाजकारण व वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांच्या शब्दाला धार असली तरीही "आपलेपणा" हा चेअरमन यांचे आणखी एक वैशिष्ट्य.
त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांनी नगरसेविका म्हणून उत्तम काम केले आहे. तर फलटण नगर परिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेचा घरंदाज वारसा आहे, त्यामुळे येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत सुधीर अहिवळे यांच्या कडून मोठया अपेक्षा आहेत.
साप्ताहिक फलटण दर्शन च्या माध्यमातून वृत्तपत्र क्षेत्रात ही गेल्या दोन तपाहून अधिक काळ सुधीर अहिवळे यांनी यशस्वी काम केले आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघर्ष करण्याची भूमिका ही सुधीर अहिवळे यांनी अनेक वेळेला घेतली आहे. जिथे अन्याय तिथे चेअरमन सुधीर अहिवळे जणू हे समीकरणच झाले आहे. सुधीर अहिवळे यांना भावी जीवनामध्ये सुख शांती उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा.
सचिन मोरे,
जिल्हाध्यक्ष - प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य.