फलटण येथील ज्येष्ठ क्रिकेटपटू व क्रिकेट प्रशिक्षक इस्माईल शेख यांचे आज दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते ५८ वर्षाचे होते. जुन्या पिढीतील जाणकार क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जात होते. येथील श्रीमंत रामराजे क्रिकेट ॲकॅडमी मध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले होते. फलटण येथील अनेक क्रिकेटपटू घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. इस्माईल शेख सर यांच्या अकस्मात निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मंगळवार दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मलठण येथील कब्रस्तान मध्ये दफन विधी करण्यात येणार आहे.