फलटण प्रतिनिधी -
जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांचे वतीने छ.शाहु स्टेडियम सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयची खेळाडू व फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पंकज पवार यांची कन्या कु.श्रेया पंकज पवार हिने 19 वर्ष वयोगटात विजेतेपद मिळविले व तीची निवड कोल्हापूर विभागस्तरावर झाली आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य मा. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी ( बेडके), नियामक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.थोरात सर,पर्यवेक्षक के.एच. खरात सर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी अभिनंदन केले आहे.