फलटण सारख्या निमशहरी गावात गेल्या ७ वर्षापासून डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि त्यांचे सहकारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करुन तरुणांना शारीरिक व्यायामाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतांना त्यांच्या या सामाजिक कार्याला आपला सलाम असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज
शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज बनल्याचे स्पष्ट करताना या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वच स्पर्धक हे विजेते असल्याचे नमूद करीत आपण स्वतः पुढील वर्षी फलटण मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितले.
येथील स्पर्धक राज्य व राष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पाठवा
डॉ. प्रसाद जोशी यांनी सांधेरोपण केलेले ज्येष्ठ स्त्री - पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले हे कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांचेसह स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे महेश मांजरेकर यांनी अभिनंदन केले. फलटण मॅरेथॉन स्पर्धकांनी राज्य व देश पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी महेश मांजरेकर यांनी केले.
डॉ. जोशी यांची आरोग्य संवर्धनाची प्रेरणा कौतुकास्पद
व्यायाम करा, लवकर झोपा, लवकर उठाआवश्यक तेवढेच खा
गड चढून उतरण्याच्या स्पर्धांचे आयोजन करा
फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या
डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ७ वर्षे सातत्य राखून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला अधिक चांगले स्वरुप देण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद असल्याचे सांगताना सातारा मॅरेथॉन ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचा सहभाग नोंदवून डॉ. प्रसाद जोशी यांनी फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याकरता प्रयत्न करावेत यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
प्रत्येक वर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आहे
मान्यवरांचे आदर्श व विचार तरुणांसमोर ठेवण्याचा प्रयत्न
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नामवंतांना पाचारण करुन त्यांचे विचार, त्यांचे आदर्श समाजासमोर विशेषतः तरुण पिढी समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करीत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.