सोलापूर प्रतिनिधी : माळशिरस येथील धनुर्धारी विजयकृष्ण स्वाती नवनाथ थोरात याने राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत बाँझपदक पटकावले आहे. या विजयाने माळशिरसचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा दि. २३ व २४ मार्च रोजी आंध्र प्रदेश (गंटूर) येथे पार पडली. जिथे देशभरातून आलेल्या दिग्गज धनुर्धाऱ्यांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. विजयकृष्ण थोरात याने अचूक तिरंदाजी करत प्रत्येक फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि अंतिम फेरीत सहा गुणांसह विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल प्रशिक्षक सुरज ढेंबरे, शेखर देवकर, निखिल गुरव यांनी अभिनंदन केले आहे.