फलटण प्रतिनिधी :
श्री गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठान आयोजित नोटरी चषक भव्य फूल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे ( साखरवाडी प्रीमियम लीग) आयोजन शनिवार दिनांक १५ व रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकून आठ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा जयकांत व्हारियर्स हा संघ विजेता ठरला तर अध्यक्ष ११हा संघ उपविजेता ठरला.
स्पर्धांचे उद्घाटन श्री दत्त इंडिया शुगर युनिट - साखरवाडी चे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर , महानंदचे माजी उपाध्यक्ष डी .के .पवार , श्रीराम कारखान्याचे व्हॉईस चेअरमन नितीन भोसले, दत्त शुगरचे तांत्रिक विभाग प्रमुख पाल साहेब,चीफ इंजिनिअर अजित कदम, कांताराम भोसले, ज्ञानदेव भोसले, श्रीरामचे संचालक अशोक सोनवणे, साखरवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. अपर्णाताई बोडरे , ग्रामपंचायत सदस्य हरिष गायकवाड, ओंकार भोसले, सुनील शंकरराव भोसले, ज्येष्ठ कबड्डीपटू डॉ. खानविलकर, खो - खो मार्गदर्शक संजय बोडरे, विलास भगत, शरद भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भोसले, उपाध्यक्ष संजय भोसले, सचिव हरिदास सावंत, स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू व व्यवस्थापक तसेच अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भोसले व उपाध्यक्ष श्री संजय भोसले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सचिव हरिदास सावंत यांनी प्रतिष्ठान च्या कार्याचा आढावा सादर करून भविष्यातील वाटचाली संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. स्पर्धेचे पहिले बक्षिस रुपये ११००१/- रोख व आकर्षक चषक , दुसरे बक्षिस रुपये ७००१/- रोख व आकर्षक चषक असे असून आणखी बरीच बक्षिसे देण्यात आली. अशा प्रकारच्या स्पर्धेचे साखरवाडी परिसरातील हे पहिले वर्ष असून भविष्यात क्रिकेट बरोबरच आणखी काही मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन प्रतिष्ठान कडून करण्याचे सूतोवाच अध्यक्ष सचिन भोसले , उपाध्यक्ष संजय भोसले, सचिव हरिदास सावंत व इतर पदाधिकाऱ्यांनी केले.
मालिकावीर वसंत तरंगे, उत्कृष्ट फलंदाज अनिकेत भोसले, उत्कृष्ट गोलंदाज जॉन गायकवाड तर अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून भगवान बोडरे यांना गौरवण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनिल चव्हाण, प्रशांत मंडाले, शुमम थोरात, राहुल जाधव, राहुल जगताप, अजय गलियल, भगवान बोडरे, मनोज गुंजावटे, मोहन कुराडे, जॉन गायकवाड, विजय निंबाळकर, सौरभ गायकवाड, किरण किरण गावडे यासह रोटरी क्लबच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.