फलटण प्रतिनीधी :
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील १४ गुन्हेगार याना तडीपार करण्यात आले असुन पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी फलटण ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगारावर मा. प्रातअधिकारी फलटण याचेकडे प्रस्ताव देण्यात आला होता त्या अनुशंगाने त्यानी सदर १४ जणांच्या विरुध्द प्रात अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले यांचे आदेशाने तडीपार करण्यात आले आहे
१) मनोहर संजय जाधव रा साखरवाडी ता फलटण जि सातारा, २) सागर राजेद्र गायकवाड रा आसु ता फलटण जि सातारा.३) आदिनाथ काशिनाथ मोटे रा सरडे ता फलटण जि सातारा ४) सचिन बाळु बोडरे रा पिंपळवाडी ता फलटण जि सातारा, ५) खुशवंत लालासो चव्हाण रा विचुर्णी ता फलटण जि सातारा ६) सागर युवराज घाडगे रा मलठण ता फलटण जि सातारा ७) किरण भिमराव घाडगे रा मलठण ता फलटण जि सातारा ८) अक्षय अंकुश जाधव रा ताथवडे ता फलटण जि सातारा ९) सुर्यकांत मुगुटराव निंबाळकररा राजाळे ता फलटण जि सातारा १०) बबन चिंतामणी भिंगारे रा आसु ता फलटण जि सातारा ११) संतोष नामदेव जगताप रा सुरवडी ता फलटण जि सातारा १२) अमित बाळासो जगताप रा विडणी ता फलटण जि सातारा १३) विजय बापु कांबळे रा निंभोरे ता फलटण जि सातारा १४) कुंदा अनिल चौधरी रा निंभारे ता फलटण येथील राहणारे असुन त्याना दिनांक १३/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ या कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात प्रवेश करण्यास आणि निवास करण्यास मनाई करण्याचे आदेश निर्गमीत केले असुन वरील १४ जणांना फलटण तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, राहुल धस यांच्या आदेशा नुसार करण्यात आली आहे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना तडीपार करुन कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिली आहे.