फलटण प्रतिनिधी :
जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांचे वतीने आयोजित रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल जावली ता. फलटण येथे झालेल्या फलटण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या सौ.वेणुताई चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज तरडगावच्या संघाने अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाचे नेले (किडगाव)ता.सातारा येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी ( बेडके), नियामक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हि.बी.माने,पर्यवेक्षक एस.व्ही. क्षिरसागर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक व तरडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.