३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे फलटण येथे २८ ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे सदर स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली. ते फलटण येथील मुधोजी हायस्कूल येथे आयोजित नियोजन बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, सातारा जिल्हा खो - खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष मनोहर यादव, कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटना अध्यक्ष आर. वाय. जाधव, सांगली जिल्हा खो - खो क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, जिल्हा खो - खो संघाचे उपाध्यक्ष नितीन भोसले, दादासाहेब चोरमले, जिल्हा खो - खो संघाचे सदस्य अमरसिंह देशमूख, जिल्हा खो - खो संघाचे सदस्य दिलीप शिंदे, जेष्ठ खो - खो खेळाडू नजीरभाई शेख, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबासाहेब गंगवणे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, मुधोजी हायस्कूलचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे, जेष्ठ नेते भिमदेव बुरुंगले, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निबाळकर पतसंस्था जगन्नाथ उर्फ भाऊसोा कापसे, श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक राहुल निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटणला ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे नियोजन करताना खेळाडूंसह इतर सर्वच शिक्षक, पदाधिकारी व अधिकार्यांच्या भोजन व निवास व्यवस्था उत्कृष्ट करावी अशा सूचना श्रीमंत संजीवराजे यांनी दिल्या.
यापूर्वीही खो - खो स्पर्धेचे फलटणला उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. विविध समितीमध्ये कार्यरत असण्याऱ्या पदाधिकारी योग्य नियोजन करतील अशी अपॆक्षा व्यक्त करतानाच फलटणला होणारी ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट अशीच झाली पाहिजे असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केला.
यावेळी क्रीडांगण समिती, मंच समिती, उद्घाटन - बक्षीस - वितरण व समारोप समिती, निवास समिती, पंच व अधिकारी निवास व्यवस्था समिती, वाहतुक समिती, भोजन व्यवस्था समिती, प्रथमोपचार समिती, सुरक्षा समिती, मार्चपास फ्लॅग होस्टिंग समिती, तांत्रिक समिती, निमंत्रण समिती, पाणी व्यवस्था समिती, रेकॉर्ड समिती, स्टॉल समिती, निरिक्षण व स्वच्छता समिती, स्वागत समिती व प्रसिद्धी समितीचे गठण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे.
बैठकीनंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, खो - खो संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक व इतर मान्यवरांनी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकूल येथे जाऊन क्रीडांगणाची पाहाणी केली.