फलटण : वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते म्हणून नुकतीच इम्तियाजभाई नदाफ यांच्या नावाची घोषणा राज्य अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली. त्यानिमित्ताने इम्तियाजभाई नदाफ यांचा फलटण येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव वैभव गिते, वंचित बहुजन आघाडी पूर्व विभाग जेष्ठ नेते सुभाषराव गायकवाड, सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. चित्रा गायकवाड, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, सातारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विकास निकाळजे, फलटण शहर अध्यक्षा सौ. सपना भोसले, सातारा जिल्हा संघटक रणजीत मोहिते, सातारा जिल्हा माजी संघटक गौतम मोहिते, सुखदेव रणदिवे, अमोल लोंढे,अमित गायकवाड, बी.डी.घोरपडे, चंद्रकांत गायकवाड, विजय नाना काकडे, प्रमोद गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.