फलटण प्रतिनिधी- स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत दि.६ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये जालंधर (पंजाब ) येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय १९ वर्षाखालील राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून फलटण तालुक्याचे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर नांदेड येथे दिनांक ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचा संघ नांदेडहून राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवानावर होणार असून दिनांक ६ ते ११ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होईल.
महेश खुटाळे सर यांची महाराष्ट्र सांघाच्या प्रशिक्षक पदी नेमणूक झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या हॉकी क्षेत्रातील खेळाडू व प्रशिक्षक यांनी आनंद व्यक्त केला आहे. महेश खुटाळे सर यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल मा अध्यक्ष, विधान परिषद माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आमदार माननीय दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो.खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य गंगावणे हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, खुरंगे सर धनश्री क्षीरसागर ,माजी राष्ट्रीय खेळाडू शिरीष वेलणकर, सुजित निंबाळकर तसेच दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बहुबली शहा, प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, सचिन लाळगे यांनी अभिनंदन केले.