(श्रीवर्धन) : चॅम्पियन्स कराटे क्लब मुख्य प्रशिक्षण केंद्र, श्रीवर्धन येथे दिनांक 03 नोव्हेंबर ते 05 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या कराटे ब्लॅक बेल्ट दान ग्रेडिंग परीक्षेत चॅम्पियन्स कराटे क्लब फलटणचे एकूण 18 खेळाडू सहभागी झाले होते. त्यांना ब्लॅक बेल्ट शोदान ग्रेड पदवी प्राप्त केली.
तीन दिवस चाललेल्या या ब्लॅक बेल्ट कॅम्प मध्ये फिजिकल फिटनेस, काता, किहाॅन, कुमिते, रोड फाईट अशा वेगवेगळ्या प्रकारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली, या ब्लॅक बेल्ट दान ग्रेडिंग परीक्षेमध्ये पुणे, मुंबई, महाड, फलटण, सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण 65 खेळाडूंनी भाग घेतला होता. या ब्लॅक बेल्ट दान ग्रेडिंग एक्झाम ला परीक्षक म्हणून सेन्साई अविनाश मोरे यांनी काम पाहिले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक सिहान संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसांचा ब्लॅक बेल्ट दान ग्रेडिंग कॅम्प पार पडला, यामध्ये चॅम्पियन्स कराटे अकॅडमी फलटण येथील 18 खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट शोदान, निदान संदान अशा वेगवेगळ्या ग्रेड संपादन केल्या. त्यांची नावे पुढील प्रमाणे
सेन्साई सुरज ढेंबरे (ब्लॅक बेल्ट संदान) स्मिता पवार (ब्लॅक बेल्ट निदान) सेन्साई प्रिया शेडगे, शंतनू जाधव, सिद्धी नाळे, ओम दोशी, योगीराज भिंगारे, श्रेय दोशी, अथर्व खरात, अपूर्वा करपे, मिताली सस्ते, आर्या येळे, प्रज्ञा भिसे, प्रिशा शिंदे, अनुष्का कोठारी, इरम शेख, जान्हवी निंबाळकर, मानसी राऊत या खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट शोदान ग्रेड संपादन केली.
हे सर्व खेळाडू सेन्साई सुरज ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स कराटे क्लब फलटण येथे प्रॅक्टिस करत आहेत.