सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची फलटण पूर्व भागात कारवाईचा धडाका सुरुच. जुगार अड्डयासह आता मटका अड्डयावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे
फलटण (प्रतिनिधी ) ११ जून २०२२
गुणवरे (ता.) फलटण येथिल वडारवस्ती येथे बापु राजाराम जंगम रा. गुणवरे ता. फलटण याचे रहाते घरात बापु राजाराम जंगम व ४ व्यक्ती तीन पानी पत्त्याचा जुगाराचा डाव पत्त्याच्या पानावर पैजेवर पैसे लावून जुगार खेळत असलेने सदर अड्डयावर छापा मारला असता ठिकाणी जावुन छापा टाकला असता ५ जणांना अटक केली असल्याची माहिती फलटण ग्रामिण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. या विषयी सविस्तर माहिती अशी.
गुणवरे ता. फलटण येथील बापू राजाराम जंगम यांच्या घरी इसम नामे नागेश दिपक कुराडकर वय २७ वर्षे, सुनिल राजू कुराडकर वय ३० वर्षे, सुनिल शंकर आढाव वय ५१ वर्षे, बापू राजाराम जंगम वय २४ वर्षे, बाबासो भिमा कुराडकर वय ४० वर्षे सर्व रा . गुणवरे ता . फलटण असे मिळुन आले व जुगार | खेळत असले डावाचे ठिकाणी सदर इसमांनी टाकून दिलेले पत्त्याची पाने व रोख रक्कम ८४३० / -रु.व इतर साहित्य मोबाईल १४,००० / - रु किंमतीचे असे एकुण रोख रक्कम व साहित्य असे मिळून एकुण २२,४३० / -रू किमंतीचा मुद्देमाल मिळून आला आहे . सदर ठिकाणी एकुण २२, ४३०/ - रु किंमतीचे जुगाराचे साहित्य, मोबाईल व रोख रक्कम मिळुन आलेने इसम नामे नागेश दिपक कुराडकर वय २७ वर्षे, सुनिल राजू कुराडकर वय ३० वर्षे, सुनिल शंकर आढाव वय ५१ वर्षे , बापू राजाराम जंगम वय २४ वर्षे ,बाबासो भिमा कुराडकर वय ४० वर्षे, सर्व रा . गुणवरे ता . फलटण यांचे विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करणेत आला आहे.सदरची करवाई पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक सातारा अजित बो - हाडे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस श्री. धन्यकुमार गोडसे यांचे सुचनेप्रमाणे सह. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सुधाकर सुर्यवंशी,बबन साबळे, अभिजीत काशिद,दिपाली अलगुडे व महेश जगदाळे यांनी केली आहे.