फलटण प्रतिनिधी -
पणजी गोवा येथे दिनांक 8 / 10/2023 रोजी पार पडलेल्या आयर्न मॅन 70.3 स्पर्धेत 50 ते 54 या वयोगटात आयोजकांनी दिलेली वेळ 8 तास 40 मिनिटाची होती ती श्री जाधव यांनी 7 तास 34 मिनिटात स्पर्धा पूर्ण केली
आयर्न मॅन स्पर्धा ही अत्यंत खडतर व जगातील कठीण स्पर्धेमध्ये याची गणती केली जाते या स्पर्धेमध्ये समुद्रात दोन किलोमीटर पोहणे त्यानंतर 90 किलोमीटर सायकल व लगेच 21 किलोमीटर रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप असते या स्पर्धेमध्ये जगातील 35 देशातील जवळपास बाराशे स्पर्धक सहभागी झाली होती
श्री जाधव हे जलसंपदा विभागात कार्यरत असून त्यांना व्यायामाची आवड असल्यामुळे हे त्यांनी डॉक्टर प्रणील भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पूर्ण केली त्यावेळी त्यांचे ईडन गार्डन हेल्थ सेंटर व सर्व क्षेत्रातील मित्रांनी चांगले कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या.