फलटण प्रतिनीधी:- दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी रात्रीच्या वेळी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ रोजी ९ वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी श्रीमती माया काशिनाथ रोकडे (वय-५२ वर्षे, रा.मंगळवार पेठ, समाजमंदिर जवळ, फलटण )या माळजाई मंदिराचे पाठीमागील, डेक्कन चौकाकडे जाणारे कच्चे रोडवरून जात असताना अंदाजे २० वर्षे,काळा टी शर्ट घातलेला तरुण, अंगाने सडपातळ असलेला व तोंडास रुमाल बांधलेला व मोटार सायकल चालक तरुण त्याचे अंगामध्ये लायनिंगचा पांढरा हिरवा शर्ट घातलेला,वय अंदाजे २० वर्षे असलेला व डोक्यात हेल्मेट असलेला या दोन अनोळखी तरुणांनी यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील ७ हजार रुपये किमतीचे एक गळ्यातील काळे मणी असलेले मणीमंगळसुत्र खेचुन, ओढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास म.पो.हवा.माधवी बोडके करत आहेत.