मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही बलात्काराची घटना घडली होती. कौन्सिलर असलेली २६ वर्षीय तरुणी लोणंद या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावर आली होती.
पुणे | धैर्य टाईम्स | क्राईम
पुण्यातील स्वारगेट डेपोत झालेल्या तरूणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर चहुबाजूनं रोष व्यक्त केला जात आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री १ वाजता ताब्यात घेतलं आहे.आरोपीचा युद्धपातळीवर शोधकार्य सुरू होते.
मात्र, गुनाट गावातील शेतात लपून बसलेल्या दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शिताफिनं पकडलं. पोलीस कोठडीत नेल्यानंतर दत्ता गाडेनं माझं चुकलं, मला माफ करा, टाहोफोडत त्यानं चुक कबूल केली आहे. तसंच एक मोठा दावाही केला आहे.
आरोपीला पुणे पोलिसांनी कोठडीत नेल्यानंतर गाडेनं चुक कबूल केली. 'माझं चुकलं, मी पापी आहे' असं म्हणत दत्ता गाडेनं टाहो फोडलं आहे. तसेच एक धक्कादायक दावाही केला आहे. 'मी अत्याचार केला नाही, सहमतीनं संबंध आले आहेत'. असा दावा गाडेनं पोलिसांसमोर केला आहे. दत्ता गाडेनं हा दावा पोलिसांसमोर केला असून, या प्रकरणाचा कसून तपास पोलीस करीत आहेत.
आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मध्य रात्री १ वाजता स्वारगेट प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुन्हे शाखेचे पथक, स्वारगेट पोलिसांचे पथक यासह ५०० पोलिस अधिकारी कर्मचारी गेल्या ३ दिवसांपासून गुनाट गावात होते.
४०० ते ५०० ग्रामस्थांच्या वतीनं चांगला पाठिंबा मिळाला. श्वान पथकानं सुद्धा उत्तम कामगिरी केली. ड्रोनमुळे आरोपीचा मार्ग कळला'. 'मध्यरात्री १.१० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज न्यायालयात आरोपीला हजर केले जाईल. तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे', असं पोलीस आयुक्त म्हणाले.