सातारा दि.21 : अन्न व औषध प्रशासन, सातारा कार्यालयाकडुन दिनांक 19 जून 2024 रोजी मे.साईनाथ पान शॉप, महात्मा फुले चौक फलटण, सातारा या पेढीकडून प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होत असल्या कारणाने पेढीवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये रुपये 3 हजार 969 रुपये किंमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आले असून प्रतिबंधित अन्नपदार्थाची विकी केल्याने राहुल जगताप व रामभाऊ जगताप यांचे विरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनला एफआयआर देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.