फलटण प्रतिनीधी:- पोलिस असल्याचे सांगून एका वृद्धास कोळकी येथे फसवून सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक १८ रोजी २:४० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामजी जयरामभाई भानुशाली (वय-७५ वर्षे, रा. सावता माळी नगर, कोळकी, ता. फलटण, जि. सातारा) यांना शिंगणापुर रोड भाजी मंडई कोळकी येथे पाठीमागुन मोटार सायकलीवर आलेल्या एक अनोळखी व्यक्तीने थांबवुन म्हणाला की, पुढे नाकाबंदी, चेकींग चालु आहे असे म्हणुन त्याने फिर्यादी नामजी जयरामभाई भानुशाली यांना पोलिस असल्याचे सांगून तपासले व त्यांच्याकडे असलेले रोख रक्कम ४० हजार रुपये व सोन्याची अंगठी ठेवली व ईतर समान रूमलात ठेवून रुमालाची गाठ मारुन परत दिले व फिर्यादी यांना संभाळुन जावा असे म्हणाला. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या दुकानात गेले व रुमालाची गाठ सोडून पाहिले असता त्यामध्ये रोख रक्कम ४० हजार रुपये व ईतर सामान दिसले पण हातातील सोन्याची अंगठी दिसली नाही यानंतर फिर्यादी यांच्या लक्षात आले अज्ञात व्यक्तीने पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक केली असून सोन्याची अंगठी लंपास केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.