फलटण : फलटण नगर परिषद, फलटणचे माजी नगराध्यक्ष ॲड. रमेशचंद्र सखाराम भोंसले-पाटील (नाना) यांचे आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी आकस्मिक दुःखद निधन झाले. राजे गटाचे जेष्ठ नेते व मार्गदर्शक म्हणून ते परिचित होते. फलटण येथील निष्णात वकील म्हणूनही त्यांची विशेष ख्याती होती.
आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.