फलटण प्रतिनीधी:- केवळ तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या प्रेयसी बरोबर लग्न करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या आरोपीस फलटण शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या सहा तासात तपास करत अटक केल्याची माहिती सातारा अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी फलटण येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली.यावेळी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, फलटण शहर पोलीस निरीक्षक सुनिल शेळके उपस्थित होते.
फलटण शहर पोलिस ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर पुढे म्हणाले, दिनांक - १७ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास श्री सिध्दीनाथ गणेश तरुण मंडळ शिवाजीनगर फलटण येथुन अजित पोपट बुंरुगले (वय २४ वर्षे, रा नगरपरीषद शाळा क्रमांक ७ चे पाठीमागे शिवाजीनगर, फलटण, जि. सातारा) हा घरात कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेला आहे तो अघाप पर्यत परत आला नाही. तरी मिसीग मुलाचा शोध व्हावा म्हणुन मिसिंग पोपट आप्पा बुरुगले यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे दिली होती, त्याप्रमाणे मिसींग केस रजिस्टर नंबर ६६/२०२३ प्रमाणे दिनांक १८ रोजी दाखल करण्यात आला होता.
पुढे बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर म्हणाले सदर मिसींग केस दाखल झाल्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांनी मिंसीग तासु, मपोना १६०९ बोबडे यांचे कडे देण्यात आलेला होता. मिसीग तपास करत असताना दिनांक १९ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विडणी ता. फलटण गावचे हद्दीमध्ये दाखल मिसीगचे वर्णनाचे एक अनोळखी बेवारस प्रेत मिळून आले. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे १५१०/२०२३ भा.द.वि.स. कलम ३०२,२०१ प्रमाणे दिनांक १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील प्रमाणे फलटण शहर पोलीस ठाणे मिसीग रजि नंबर ६६/२०२३ मधिल मिसीगचे वर्णन व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे मधिल मिळुन आले अनोळखी बेवारस मयताचे वर्णन व कपडे यांचे साधर्म्य असल्याने सदर मिसीग तपास कामी पोलीस ठाणे कडील पो.उप.नि शिंदे यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची खास नियुक्ती करुन मिसीग व्यक्तीचे सी.डी.आर चे तांत्रीक विश्लेषण तसेच मिसीग इसमाचे पत्नीकडे अंत्यत कसोशिन व कौशल्यपूर्ण तपास करुन मिसीग तपासामध्ये मयत अजित पोपट बुंरुगले (रा. शिवाजीनगर फलटण) यांची पत्नी हिचे आरोपी करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड संस्कती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे) यांचे प्रेमसंबध होते. सदर प्रेमसंबधास व लग्न करणेसाठी तिचा पती हा अडथळा येत असल्याने आरोपीने त्यांचे साथीदार राहुल उत्तम इंगोले (वय २२ वर्षे रा. लोहमार्ग रोड बालाजी ट्रेडर्सचे समोर, वाघोली पुणे) यांचे मदतीने यातील मिसीग व्यक्ती अजित बुंरुगले यांस फलटण येथे घरातुन बाहेर फोन करुन बोलावुन घेवुन त्यांचा साथीदार यांचे मदतीने मिसीग अजित बुरुगले यांचा दोरीने गळा आवळुन त्यानंतर त्यांचे हात पाय दोरीने बांधुन पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने त्यांस निरा उजवा कॅनॉल मध्ये टाकुन देवुन त्यांचा खुन केला आहे, अशी कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले यांने दिली असुन त्यास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिली.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचे अधिक तपासामध्ये आरोपी करण विठ्ठल भोसले (रा, थेऊर रोड संस्कती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे) यांस अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके हे करत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक समीर शेख पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सुरज शिंदे, पो.हवा वाडकर, पो.ह धापते, पो.ना जगताप, पो.कों पाटोळे, पो.कों कर्णे, पोकों खराडे, म.पो.ना बोबडे, म.पो.ना वाघ,म.पो.कों करपे यांनी सदरची कारवाई केली आहे.