महाबळेश्वर :
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद कर्मचारी वेल्फेअर क्लब महाबळेश्वर आयोजित राज्यस्तरीय नगरपरिषद कर्मचारी कबड्डी व क्रिकेट स्पर्धेमध्ये फलटण नगर परिषदेच्या महिला कबड्डी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद कर्मचारी वेल्फेअर क्लब महाबळेश्वर आयोजित राज्यस्तरीय नगरपरिषद कर्मचारी कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 पासून करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई, रुपेश जयवंशी जिल्हाधिकारी सातारा, समीर शेख जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, रामेश्वर वाघमारे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटना, अनिल पवार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन पोलीस ग्राउंड महाबळेश्वर या ठिकाणी झाले होते. यावेळी श्रीमती पल्लवी पाटील मुख्याधिकारी तथा प्रशासक महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद महाबळेश्वर, महाबळेश्वर नगर परिषद कर्मचारी वेल्फर क्लबचे अध्यक्ष अहमद नालबंद, उपाध्यक्ष बबन जाधव, सचिव आबाजी ढोबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये कबड्डी व क्रिकेट या खेळाच्या महिला व पुरुष अशा वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धा संपन्न झाल्या. तब्बल दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये कबड्डीच्या महिला गटातून फलटण नगरपरिषदेच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत राज्यभर आपली विजय पताका फडकावली.
विजय संघाचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्यासह फलटणमधील विविध मान्यवरांनी केले आहे.