फलटण प्रतिनिधी:- फलटण तलाठी कार्यालयातील कोतवाल यास जागेसह घराची सातबारा वरती नोंद मीच केली आहे कामाचा मोबदला म्हणून ५०० रुपयांची लाच स्विकारताना कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.
दिपक दौलतराव उदंडे (वय ४९ वर्षे, पद महसुल सेवक (कोतवाल) सजा फलटण रा. १२३, कसबा पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या कोतवालाचे नाव असून सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचे पत्नीचे नावे फलटण येथील दीड गुंठे जागेसह खरेदी केलेल्या घराची सातबारा वरती नोंद ही मीच करून घेतली आहे असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून १ हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती ५०० रुपये मागणी करून ती स्विकारताना दिपक दौलतराव उदंडे या कोतवालास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.फलटण शहर पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, २ ला.प्र.वि. पुणे,राजेश वसंत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले ला.प्र.वि. सातारा, पो.हवा गोगावले ला.प्र.वि. सातारा, पो.ना गणेश ताटे, ला.प्र.वि. सातारा यांनी सदरची कारवाई केली.
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं.५२४/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार, सातारा याच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन वसंत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केले आहे.