फलटण प्रतिनिधी - जिल्ह्याच्या राजकारणामधील एक सक्षम नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट ) जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील विविध भागात जल्लोष करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.